व्होल्गा ते गंगा – मातृवंशीय ते पितृसत्ताक भारतीय समाजाचा प्रवास
व्होल्गा ते गंगालेखक: राहुल सांकृत्यायनमराठी आवृत्ती: लोकवाङ्मय गृह ‘व्होल्गा ते गंगा’ या कथासंग्रहातील २० कथांद्वारे राहुल सांकृत्यायन आपल्याला टाइममशीनमधून आठ हजार वर्षे मागे घेऊन जातात आणि मानवाचा आठ हजार वर्षांचा प्रवास गोष्टिरूपाने दाखवतात. इसवी सन पूर्व सहा हजारमध्ये निशा या मातृवंशीय समाजातल्या स्त्रीपासून ही कथा सुरू होते. कथेच्या सुरुवातीला निशाचा परिवार हा १६ जणांचा आहे. …